Home Cities अमळनेर अमळनेरमधील भगिनींनी पोलीस बांधवांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण

अमळनेरमधील भगिनींनी पोलीस बांधवांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण

0
33

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘सदरक्षणाय खल निग्रहणाय’ या वाक्याप्रमाणे समाजाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुपच्या भगिनींनी औक्षण करत राखी बांधली.

वर्षभर आपल्याला संरक्षण देण्यासाठी दिवसरात्र एक करून नागरिकांना विविध सण उत्सव आनंदात साजरा करता यावेत यासाठी आपल्या कुटुंबाबरोबर न राहता आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध असणाऱ्या पोलीस बांधवांचे आपल्या सामाजिक जीवनात फार मोलाचे योगदान असते. म्हणूनच येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुपने अमळनेर पोलीस स्टेशनला रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.

ग्रुपच्या अध्यक्ष अॅड ललिता पाटील यांच्यासह ग्रुप सदस्य वसुंधरा लांडगे, डॉ. मंजुश्री जैन, कोमल पारेख यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि सर्व पोलीस बांधवांचे औक्षण करत राखी बांधली व रक्षाबंधनासारखा पवित्र सण पोलीस बांधवांसोबत साजरा केला.


Protected Content

Play sound