चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलेवर झालेल्या अत्याचारातून तिने नवजात बालकाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणारी ३६ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी काम करून आपला उदरनिर्वाह करते. गावातील कैलास गोकूळ पाटील याने नऊ महिन्यांपुर्वी पिडीत महिलेवर दारूच्या नशेत तिच्या घराच्या झोपडीत येवून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. या अत्याचारातून महिलेने पुरूष जातीच्या नवजात बालकाला जन्म दिला. दरम्यान, समाजात बदनामी होईल या भितीपोटी महिलेने नवजात बालकाला नाल्यात फेकून दिले. दरम्यान, चोपडा ग्रामीण पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नवजात बालकाला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधम कैलास गोकुळ पाटील याला मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषिकेश हे करीत आहे.