भाजपातर्फे शास्त्री टॉवर चौकातून भव्य तिरंगा रॅली (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शहरातील टॉवर चौकातून ७५ फूट तिरंगा रॅली काढण्यात आली.

भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आले. भारत माता की जय… वंदे मातरम, या घोषणांनी शहरातील शास्त्री टॉवर चौक परिसर दणाणला होता.

यावेळी ७५ फूट लांबिचा तिरंगा कार्यकर्त्यांनी हातात घेवून शहरातून रॅली काढण्यात आली. ही रॅली शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, गोलाणी मार्केटजवळील हनूमान मंदीर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून जी.एस. मैदानात समारोप करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य तिरंगा रॅलीत जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, भाजपा उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका सुचिता हाडा, माजी महापौर तथा नगरसेविका भारती सोनवणे, युवा पदाधिकारी अक्षय जेजूरकर यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2855997224705321

Protected Content