मोहाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्ताने ग्रामसभा संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्ताने विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

मोहाडी येथे विशेष ग्राम सभा सरपंच धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, पवन भिलाभाऊ सोनवणे उपस्थित होते. याप्रसंगी प्रतापराव पाटील यांनी ग्रामसभेचे कौतुक केले. त्यांनी गाव एकसंघ राहिल्यास गावाचा विकास मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते आणि मोहाडी गाव हे भिलाभाऊ यांना मानणारे होते व आता त्यांचा वारसा पुढे नेणारे पवन भाऊ, धनंजय भाऊ याच्या मागे उभे राहणारे आहे. ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी उपस्थिती दिल्याबद्दल ही प्रताप पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पवन सोनवणे यांच्या सहकार्याने ग्रामपचायतीतर्फे ६६७ तिरंगा ध्वज उपलब्ध करण्यात येऊन सदर ध्वज लावण्याचे नियोजन दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत ५% ग्रामनिधी अंतर्गत ३४ विकलांग लाभार्थी बांधवांना ११०० रुपये आर्थिक मदत देण्यात आली तसेच १५ व्या वित्त आयोगातील १०% निधीतून कन्यारत्न असलेल्या ७० महिलांना साडी व मिठाई देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच गणेश सोनवणे ग्रा. प. सदस्य सजन राठोड, ज्ञानेश्र्वर सपकाळे, परशुराम गवळी, पूनम सोनवणे, वैशाली गवळी, ज्योती चव्हाण, यशोदा पाटील, पुनम पवन सोनवणे, ग्रामसेवक दिलीप पवार, लिपिक हेमंत सोनवणे, नाना सोनवणे, गणेश गवळी, चंदू ठाकरे आदी उपस्थित होते.

Protected Content