अमळनेर (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या माध्यमातून सांस्कृतीक केंद्रच्या सामाजिक भवन म्हणून बुद्ध विहाराचे नुकतेच उद्धघाटन करण्यात आले. शहराच्या प्रथमदर्शनी असलेल्या फरशी रोड भागात आकर्षक अशा सामाजिक बुद्ध विहाराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदानंशीव यांच्या उपस्थितीत पार पडला.
बुद्ध विहाराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार साहेबराव यांनी फीत कापून केले. त्यानंतर बौद्ध धर्म गुरु भन्ते गुणरत्न यांच्यासह बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे बौद्धाचार्य द.रु. सैंदाने, भारतीय बौद्ध महासभेचे सिद्धार्थ सोनवणे, यांनी बुद्ध वंदनासह विधिवत पूजा केली. या प्रसंगी प्रा डॉ जाधव, सौ जाधव व सामाजिक कार्यकरत्यां दीप्ती गायकवाड यांनी बुद्ध मूर्तीची पूजा केली. यावेळेस कैलास खैरनार व ऍड ब्रम्हे यांनी भन्ते गुणरत्न यांना चिवरदान देऊन त्यांचा सन्मान केला.
या वेळी सत्काराला उत्तर देतांना माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की, जगाला बुद्धाचा विचारांची गरज आहे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका-संघटित व्हा-संघर्ष करा या तत्व प्रणालीवर समाजाने चालले पाहिजे. अन्याया विरुद्ध बंड केले पाहिजे, असे उपस्थितीत जनसमुद्याला सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिर्हाडे यांनी सांगितले की, तथागत गौतम बुद्ध हे शेतकरी कुटूंबातील होते. म्हणून त्यांना कुणबी पुत्र बोलले जाते. त्यांनी शांतीसह वेळप्रसंगी क्रांतीचा मार्ग स्वीकारायला सांगितले आहे. मानवमुक्तीचा मार्गदाता म्हणून जगातील लोक बुद्ध धम्माकडे पाहतात, असे सांगितले.
या वेळी नगरसेवक श्री.मनोजबापु पाटील, बांधकाम सभापती सुरेश पाटील,सलीम टोपी, फयाजखाॅ पठाण,संजय पवार, संतोष लोहरे, संतोष पाटील,प्रा,अशोक पवार, अॅड.तिलोत्तमा पाटील, सौ.माधुरी पाटील, महीला काॅग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.सुलोचना वाघ, हाजी शेखा मिस्तरी, डी.डी.पाटील,व.ता. पाटील, खा.शि.मंडळाचे अध्यक्ष प्रदिप अग्रवाल, संचालक पंकज मुंदडा, विनोद कदमसर, धुळे RPIचे नेते राजु पगारे, कैलास नामदेवराव पाटील,अॅड.प्रशांत संदानशिव,सोमचंद संदानशिव, प्रविण जैन, कुंदन पाटील,काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळआबा बौरसे, धर्मा ब्राह्मणे हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
बुद्धविहाराला एक लाख रुपये दान
यावेळी बुद्धविहाराला रोख रक्कम एक लाख रुपये स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या बबिता ताजने यांनी दान स्वरूपात दिल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. “तथागत गौतम-बुध्द सांस्कृतिक केंद्र,अमळनेर”च्या बुद्ध-धम्म विहारास भेट देतांनां राज्याचे महसुल-मंत्री तथा पालकमंत्री मा. ना.चंद्रकांतदादा पाटील, मा.आमदार साहेबरावदादा पाटील,डाॅ.आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदानशिव,प्रा.डाॅ.विजय तुंटे,प्रा.हर्षवर्धन जाधव,प्रा विजय गाढे, विक्रांत पाटील, न.प.सदस्य मनोज पाटील, नगर सेवक नरेंद्र संदानशिव, नगर सेवक फयाज पठाण , प्रा.भानुदास गुलाले,आरपीआय चे यशवंत बैसाणे, प्रा.विजय वाघमारे, प्रा.बापु संदानशिव, भा.ज.पा.शहराध्यक्ष शितल देशमुख,धुळे रिप.नेते पगारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकार गौतम बिर्हाडे, , सत्तार खान, अजय भामरे, रामोशी सर इत्यादींचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमचंद संदानाशिव, ज्ञानेश्वर संदांशीव, प्रा विजय खैरनार, प्रा कदम, प्रा राहुल निकम, संजय संदांनशीव, प्रा कृष्णा सनदांशीव, अमोल सनदांशीव, लोकमतचे विजय संदांशीव, देवदत्त संदांशीव, धर्मा ब्रम्हे, भोम्या भाऊ इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ विजय तुंटे तर आभार प्रा विजय गाढे यांनी केले.