जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात मध्यरात्री बंद घरातून ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि चांदीच्या मुर्त्या असा एकूण १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज भिमराव पवार (वय-४०) रा. चिंचोली ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता सर्वजण जेवण करून घरात झोपलेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून त्यांच्या घरात असलेले ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या मुर्त्या असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता समोर आले आहे. याबाबत युवराज पवार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी १२.३० वाजता अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफार तडवी करीत आहे.