Home Cities अमळनेर श्रावण मासानिमित्त मंगळग्रह मंदिरात लघुरुद्र महापूजा

श्रावण मासानिमित्त मंगळग्रह मंदिरात लघुरुद्र महापूजा

0
71

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील मंगळग्रह देव मंदिराच्या परंपरेप्रमाणे पहिल्या श्रावण सोमवारी श्री लघुरुद्र महापूजा संपन्न झाली.

जळगाव जिल्हा वकील संघाचे नवनियुक्त अध्यक्ष व जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दिलीप मंडोरे हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते. मुख्य पुरोहित केशव पुराणिक होते. त्यांना सुनील मांडे, सारंग पाठक, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, अक्षय जोशी, मेहुल कुलकर्णी, व्यंकटेश कळवे, मयूर राव, मिलिंद उपासनी यांनी सहकार्य केले.

लघुरुद्र महापूजा अभिषेकानंतर विशेष महाआरती झाली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ, सेवेकरी, भाविक व वकील मंडळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound