मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणच्या मुक्ताईनगर विभागांतर्गत मुक्ताईनगर व अंतुर्ली गाव व परिसरामध्ये धुळे, नंदुरबार, मालेगाव व जळगाव फिरत्या पथकाद्वारे मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली.
त्यामध्ये मीटरमध्ये फेरफार करून कंपनीत लाखो रुपयांचा गंडा करणाऱ्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. यात एकूण ३३ ग्राहकांची वीज चोरी उघडकीस आली; त्यात वीजचोरीची रक्कम ३१,१६००० असून दंडाची रक्कम ३१,४००० रुपये इतकी आहे. त्यामुळे परिसरात वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महावितरणतर्फे पुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत.