बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कर्मचाऱ्याच्या भरोस्यावर कार्यालय सुरू असल्याचे निदर्शनास असल्याचे दिसून आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष चेतन तायडे हे सोमवार १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता बोदवड सामाजिक वनीकरण विभागात माहिती अधिकार अर्ज दाखल करण्यासाठी गेले. त्यावेळी त्याठिकाणी एकही शासकीय कर्मचारी उपलब्ध नव्हते. याबाबत जळगाव येथील वन संरक्षक अधिकारी भरत शिंदे यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागांमध्ये रोजदारीने ठेवलेला ऑफिस बॉय यांना विचारले की, कार्यालयामध्ये आज कोण कोण हजर व गैरहजर आहे व जन माहिती अधिकारी कोण आहे. असे विचारले असता धक्कादायक प्रकार समोर आली आहे. या कार्यालयामध्ये कोणीही जबाबदार व्यक्ती व अधिकारी नसल्याने हे कार्यालय एका मजुराच्या भरोशावर सोडून संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. तरी शासनाच्या पगाराचा सुद्धा दुरुपयोग होताना या ठिकाणी दिसत आहे. तसेच माहिती अधिकार अधिनियम कलम ४ (ख) प्रमाणे १ ते १७ मुद्द्यांची माहिती सुद्धा या कार्यालयात आढळून आलेले नाही. संबंधित वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात. यावर संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहेत. अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना चेतन तायडे यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्या विभागाकडे कर्मचारी यांची कमतरता आहे, उद्या मी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे सांगतो अशी प्रतिक्रिया जिल्हा वन संरक्षक अधिकारी भरत शिंदे यांनी दिले.