Home Cities पाचोरा खडकदेवळा हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

खडकदेवळा हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

0
51

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. आर. सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून ३५ विद्यार्थी व ३५ विद्यार्थीनी असे मिळून एकूण ७० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रमोद गरुड गणवेश वाटपाच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय जीवनातील शिक्षणाच्या संधीचा सदुपयोग करून यशस्वी भविष्याकडे कशा पद्धतीने वाटचाल करता येऊ शकते. याबद्दल अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. एन. पाटील यांनी केले. एन. एन. पाटील व वाय. बी. परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार एस. टी. घोडेस्वार यांनी मानले.

याप्रसंगी सकाळ सत्रातील स्वप्निल बागुल, एस. जी. बाविस्कर, एस. पी. राजपूत, शिक्षकेतर कर्मचारी सुनिल गुजर आणि सागर राजपूत उपस्थित होते.


Protected Content

Play sound