ऊर्जा विभागातर्फे उज्वल भारत उज्वल भविष्य कार्यक्रम साजरा

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमातर्गत ऊर्जा विभागातर्फे आज मुक्ताईनगर विभागामध्ये मौजे हरताळे येथे उज्वल भारत उज्वल भविष्य कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास खासदार रक्षा खडसे तसेच महावितरणचे अधिक्षक अभियंता फारुख शेख, पावर फायनान्स कार्पोरेशनचे संजीव बैजारे, मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचिती, मुक्ताईनगर कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता, सरपंच हरताळे तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.

कार्यक्रमास केंद्र शासन व राज्य शासन यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती एल.ई.डी. स्क्रीनवर दाखवण्यात आली. तसेच पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमात मौजे हरताळे, कोथळी व मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली. 

यावेळी सौभाग्य योजनेचे लाभार्थी तसेच सोलर पंपाच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खा.रक्षा खडसे यांनी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजना यशस्वी होण्याकरिता लोकप्रतिनिधी व कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून प्रयत्न करावे असे आवाहन केले तसेच महावितरणतर्फे झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

Protected Content