रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तालुक्यातील सहा ग्रामसेवकांना भुसावळ न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
ससविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
या संदर्भातील वृत्त असे की, रावेर अपंग नसताना बनावट व खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे तालुक्यातील सहा ग्रामसेवकांनी सोयीच्या ठिकाणी बदलीचा लाभ घेतला होता. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल झाला. यानंतर ग्रामसेवकांनी अटकपूर्व जामिनासाठी भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथे या ग्रामसेवकांना २९ जुलैपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे.
या प्रकरणी निंबोल येथील किशोर भिवा तायडे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. यात न्यायालयाने शिवाजी गुलाबराव सोनवणे, राहुल रमेश लोखंडे, छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी व शामकुमार नाना पाटील या ग्रामसेवांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता त्यांना अल्प काळासाठी अटकेपासून संरक्षण मिळाले असले तरी आता २९ तारखेनंतर काय होणार याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.