पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यपदी निपाणे येथील प्रकाश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष मिलिंद उर्फ विकास वामन अवसरमल यांच्यासहीने आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या माजी सदस्या साधना भोळे उपस्थित होत्या. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगांव (ग्रामीण) संघटन वाढविणे, केंद्र शासन यांनी मागासवर्गीय (अनुसूचित जाती) साठी योजनांच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयांचा प्रसार करणे, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याभरात भक्कम व मजबूत करणे, भारतीय जनता पार्टीचे विचार घरोघरी पोहचविणे या कामांसाठी प्रकाश कांबळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रकाश कांबळे यांचे जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे. प्रकाश कांबळे यांचेवर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.