Home क्राईम भ्रष्ट्राचार प्रकरण : आजी – माजी अधिकाऱ्यांना पुन्हा पोलीस कस्टडी

भ्रष्ट्राचार प्रकरण : आजी – माजी अधिकाऱ्यांना पुन्हा पोलीस कस्टडी

0
44

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीचा बहुचर्चीत शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणी आजी-माजी अधिकाऱ्यांना पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मिळाली आहे; तर इतर दोन आरोपींना न्यायालयीन कस्टडी मिळाली आहे.

रावेर पंचायत समितीचा बहुचर्चीत शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणी चार आरोपींना आज सहायक पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी शितलकुमार नाईक यानी रावेर न्यायालयात हजर केले असता रावेर न्यायालयाने सह गट विकास अधिकारी दिपक संदाशिव तत्कालीन विस्तार अधिकारी ग्राम पंचायत दिनकर सोनवणे दोघांना पुन्हा तीन दिवस म्हणजेच गुरुवार, दि २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवून मिळाल्याचे वृत्त असून इतर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना जळगाव रवाना करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound