यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ता मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
यावल येथे दि. २० जुलै २०२२ वार बुधवार रोजी महाराष्टा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन डॉ. कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यावल येथे करण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी व जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यावल येथे डॉ. पवन सुशील व डॉ. प्रवीण पाटील यांनी मोफत रुग्ण तपासणी केली. या शिबिरामध्ये एकूण ३६५ गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, भाजपा किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, माजी उपसभापती पं स यावल दिपक अण्णा पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उजैनसिंग राजपूत, विलास चौधरी, ओ.बी.सी. सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे युवा अतुल भालेराव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, यावल शहर अध्यक्ष, डॉ. निलेश गडे, उपाध्यक्ष योगेश चौधरी, राहुल बारी, सरचिटणीस परिष नाईक, भूषण फेगडे, कमलाकर पाटील, लहू पाटील, मनोज बारी आदींची उपस्थिती होती.
या शिबिरास भारतीय जनता पार्टी यावल तालुका, सागर लोहार, दिपक फेगडे विशाल बारी, जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.