अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राजे सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या बँक ऑफ बडोदा बँकेला तब्बल ११५ वर्षे पूर्ण झाल्याने वर्धापन दिनानिमित्त विविध गावांच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेपयोगी वस्तूंचे वाटप बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
पातोंडा येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ बडोदा असून परिसरातील अनेक गावांचा आर्थिक व्यवहार या बँकेत होत असतो. तसेच बँकेने ग्रामीण भागातील ग्राहकांना स्थानिक ठिकाणी सुविधा मिळाव्यात यासाठी ग्राहक सेवा केंद्रे देखील सुरू केलेले आहेत. बँकेच्या स्थापना दिनाला ११५ वर्षे पूर्ण झाल्याने बँकेचा वर्धापन दिन पातोंडा बँकेत साजरा करण्यात आला.
बँक व ग्राहक सेवा केंद्र चालकाकडून पातोंडा, मठगव्हाण, दहिवद, गडखांब, धुपी आदी गावातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी बँकेचे व्यवस्थापक भूषण यवलकर,सहा.व्यवस्थापक स्वप्नील मोहळकर, कॅश हेड पुंडलिक बोरचारे, ग्राहक सेवाकेंद्र चालक मच्छीन्द्र वाघ, नरेंद्र पाटील, दिपक पवार, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मठगव्हाण शाळेचे व्यवस्थापन समितीचे सोनू गांगुर्डे, प्रशांत शिरसाठ आदींची उपस्थिती होती.