Home Cities अमळनेर मंगरूळ येथे मध्यरात्री घरात चोरी

मंगरूळ येथे मध्यरात्री घरात चोरी

0
103


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरूळ गावाजवळील भिलाटी गावातील घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ असलेल्या भिलाटी गावात राहणारे सुनील बापू पवार (वय-२३) रा. मंगरूळ ता. अमळनेर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १८ जुलै रोजी रात्रीचे जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोट्याने त्यांच्या घरातून ३० हजार रुपयांची रोकड, ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ९ हजाराचा मोबाईल असा एकूण ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचे उघड केला आले. याबाबत सुनील पवार यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.

 


Protected Content

Play sound