अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दुचाकी चोरी करणार्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिक येथील सातपूर भागातून कंपनी कामगारांच्या दुचाकी चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासात याचे धागेदोरे हे अमळनेर तालुक्याशी जुडलेले असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला अमोल दशरथ पाटील (वय २३), विशाल अधिकार पाटील (वय २२, दोन्ही, रा.मांडळ) हे दोन विना क्रमांकाच्या दुचाकींवर जाताना आढळले. त्यांची कसून चौकशी केली असता सदर दुचाकी नाशिक येथून चोरी केल्याची कबुली दिली.
अमळनेर तालुक्यातील दिनेश सुनील पाटील (रा.आनोरे) व मल्हारी रावसाहेब पाटील (रा.चौबारी) यांच्या मदतीने दुचाकी चोरून त्या तालुक्यात विकत होते. या अनुषंगाने या दोघांसह अमोल दशरथ पाटील व विशाल अधिकार पाटील यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या कडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.