रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात वीज समस्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याने आज थेट महावितरण विभागाचे कार्यालय गाठले. यावेळी विजेची समस्या तात्काळ सोडवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना तर्फे उपविभागीय अभियंता अनिल पाटील यांना निवदेनाद्वारे दिला.
रावेर शहरातील भगवती नगर मरी, माता मंदिर परिसरासह संपूर्ण शहराचा विद्युत पुरवठा प्रचंड विस्कळीत झाला असून वीज रात्री पाच ते सहा तास बंद राहत असल्याने संप्तत नागरीकांनी महावितरण विभागाचे कार्यालयाला भेट देऊन समस्या तात्काळ सोडवा, यासाठी निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की रावेर शहरात काही भागात नाला परिसर महात्मा फुले चौक मरिमाता मंदिर भगवती नगर परीसर छत्रपती शिवाती महाराज चौक, नगाझिरी अश्या अनेक परिसरात मध्यरात्री पासून जवळपास १० ते १२ तास लाईट बंद राहत आहे. त्यामुळे रावेर शहराती नागरीकांचे प्रचंड हाल होत असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. सर्वसाधारण जनतेच्या भावना लक्षात घेवून विद्युत पुरवठा सुरळीत करावा असे न झाल्यास शिवसेनेच्या स्थरावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती घेतली असता सायंकाळ पासुन वारंवार विद्युत तार तूटत असल्याने अशी समस्या निर्माण होत आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, तालुका उपप्रमुख संतोष महाजन, तालुका संघटक अशोक शिंदे, शिवसेना शहर प्रमुख राकेश घोरपळे, युवा सेना पदाधिकारी बंटी महाजन, सूर्यकांत शिंदे, रितेश महाजन, विनायक महाजन, राजेंद्र महाजन, राहुल पाटील, शुभम मानकर, प्रमोद महाजन, समाधान महाजन आदींची यावेळी उपस्थिती होते.