फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील पुरातन जैन मंदिरात वेदी शिलान्यासाचे भूमिपुजन करण्यात आले आहे.
फैजपूरच्या होले वाड्यातील जैन मंदिरात आयोजित या कार्यक्रमास अशोक डेरेकर यांचे हस्ते ध्वजारोहणाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर चंद्रप्रभू विधानमध्ये सुनील जैन, संजय निरखे यांचे हस्ते अभिषेक व पूजन झाले. माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी मुनिश्री विशेषसागर महाराज म्हणाले की, चांगल्या कामांची आवड असणारे व वाईट प्रवृत्तीचे लोकही समाजात असतात. मात्र, नेहमी संतांच्या सान्निध्यात राहिल्यास विचार परिवर्तन होतेे. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.