जळगाव प्रतिनिधी । क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पिस्तुल रोखणार्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मोहीद खान अरबाज खान (वय २१) व नवाज अली अहमद अली (वय २२ रा. दोघे गेंदालाल मिल) हे दोघे लुटीच्या गुन्ह्यात संशयित आहेत. बुधवारी रात्री १२ वाजता दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाले. यात एका तरुणाने पिस्तूल काढून समोरच्या तरुणावर रोखल्याने परिसरात खळबळ उडाली. ही माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पथक तेथे दाखल झाले. मात्र याआधीच संबंधीत तरूणांनी येथून पोबारा केला होता. यामुळे शिवाजीनगर, गेंदालाल मिल, हुडको भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात गेंदालाल मिल येथून मोहीद खान व नवाज अली यांना अटक करण्यात आली.