जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रिडा संकुलाजवळ ४० आंब्याची झाडे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते लावण्यात आली.
क्रीडा संकुलाजवळील परिसरात क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्या पुढाकाराने विविध झाडे लावण्यात आलेली आहेत. गुरूवारी या परिसरात केशर व रत्ना या जातीची ४० आंब्याची झाडे लावण्यात आलीत.
यावेळी प्रा.कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, विद्यापीठ उपअभियंता इंजि. आर.आय. पाटील, उद्यान अधिक्षक अश्विनी पाटील, ललित काटकर आदी उपस्थित होते.