पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गिरणा धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला असुन धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पाचोरा तालुक्यातील ओझर व भडगाव तालुक्यातील गिरड ग्रामपंचायतींनी गावालगत असलेल्या के. टी. वेअरवर लावण्यात आलेल्या पाट्या उघडाव्यात, या मागणीसाठी आज पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन दिले.
सद्यस्थितीत सर्वत्र मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला असल्याने नदी व नाल्यांना पुर आला आहे. तसेच गिरणा धरण हे जवळपास ८० टक्के भरले असल्याने या धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला असुन धरणाखाली असलेल्या पाचोरा तालुक्यातील ओझर व भडगाव तालुक्यातील गिरड गावाजवळील गिरणा नदीवरील के. टी. वेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकतो. असा कुठलाही प्रकार घडु नये, म्हणुन नगरपालिका प्रशासनाने के. टी. वेअरवर बसविण्यात आलेल्या पाट्या तात्काळ काढव्यात या मागणीसाठी ओझर ग्रामपंचायत व गिरड ग्रामपंचायतींतर्फे संयुक्तरीत्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.
सदरचे निवेदन अधिकृत अधिकारी प्रकाश भोसले यांनी स्विकारले. निवेदन देते ग्राहक ओझर ग्रामपंचायतीचे सरपंच पाटील पाटील, आनंदा पाटील, सदस्येश्वर ज्ञानेश्वर सोनवणे, गिरड ग्रामपंचायत सरपंच प्रदिप सोनवणे, रविंद्र चौधरी (मांडकी) हे उपस्थित होते.