Home Cities एरंडोल एरंडोल प्रमुख विकास कामांसाठी पाच कोटीचा निधी मंजूर – आमदार चिमणराव पाटील

एरंडोल प्रमुख विकास कामांसाठी पाच कोटीचा निधी मंजूर – आमदार चिमणराव पाटील

0
50


एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण, दैनिक बाजाराचे मोठे बांधणे, अत्याधुनिक व्यायाम शाळा या प्रमुख विकास कामांसाठी शासनाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली

कासोदा दरवाजा बागातील स्मशानभूमीचे नूतनीकरणसहित इतर उर्वरित कामे करणे यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एरंडोल नगरपालिका हद्दीत दैनिक बाजार ओटे बांधणे या कामासाठी दीड कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे; तसेच अत्याधुनिक व्यायाम साहित्यसह व्यायाम शाळेचे इमारत बांधणे यासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तात्काळ पाच कोटी रुपयांच्या निधी एरंडोल शहराच्या विकासासाठी मंजूर केले आहेत. यातून शहराचा विकास होणार असून यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये व नागरिकांमध्ये  समाधानाचे वातावरण आहे.


Protected Content

Play sound