धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाई निवारण्यासाठी टँकर सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस गट नेते तथा माजी उपनराध्यक्ष दिपक आनंदा वाघमारे यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तर नगरपालिकेकडून १५ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहरातील पाणी टंचाईवर मत करण्यासाठी धरणगाव शहरात व आसपासच्या कॉलनी परिसरात . पाणी पुरवठा टँकरद्वारे ५ दिवसांनी करण्यात येत आहे यावर मत करण्यासाठी तातडीने टँकर पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर दीपक वाघमारे, रिययाजोद्दीन शेख यांची स्वाक्षरी आहे.