Home राजकीय संतोष बांगर यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी

संतोष बांगर यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी

0
44

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऐन वेळेस शिंदे गटात कोलांउडी मारणारे आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आमदार संतोष बांगर यांनी विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरत गाठले होते. नंतर मात्र त्यांनी तेथून आपण पलायन करून आल्याचे सांगत मातोश्री सोबत असल्याचे ठणकावून सांगितले होते. त्यांनी अगदी रडून एकनिष्ठतेची शपथ घेतली होती. मात्र विश्‍वासदर्शक चाचणीच्या आधीच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. यामुळे त्यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी मोठी टीका केली होती.

आता हेच आमादार संतोष बांगर यांना शिवसेनेने धक्का दिला आहे. ते हिंगोली येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील होते. त्यांना या पदावरून काढण्यात आल्याची अधिकृत घोषणा पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. यामुळे आता मातोश्रीवरून बंडखोरांच्या विरोधातील कारवायांना वेग आल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound