यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील पुर्व वन विभागाच्या माध्यमातुन दि.७ जुलैपासुन तर ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, सातपुडा पर्वतातील मोहमांडली या आदीवासी शाळेतील वन विभागाच्या वतीने वन महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
यावल वनविभाग जळगांव, वनक्षेत्र यावल पुर्व मधील प्राथमिक,माध्यमिक आश्रमशाळा मोहमांडली या आदीवासी क्षेत्रातील शाळेत वनविभाग यांचेकडून वन महोत्सव दि. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड जनजागृती करिता दि. १जुलै ते ७ जुलै २०२२ या कालावधीत वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत असल्याने या कार्यक्रमा निमित्ताने सातपुडा क्षेत्रातील अतिदुर्गम भागात असलेल्या शाळेत पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, मोह मांडली शाळेचे मुख्याध्यापक आर.टी.कुमावत, रमजान तडवी पोलीस पाटील अंधारमळी, दगडू तडवी अध्यक्ष वन संरक्षण समिती यांचे हस्ते रोपे वाटप करून शाळेच्या आवारात रोप लागवड करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रकाश बारेला वनरक्षक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केली. तसेच विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल, आर.टी.चौधरी मुख्याध्यापक यांनी उपस्थितीत विद्यार्थी, विद्यार्थीनीना वन महोत्सवच्या निमित्ताने वृक्ष लागवडीमुळे होणारे फायदे या विषयावर आयोजीत कार्यक्रमात मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक डी.ई.चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक यु.के.चव्हाण यांनी केले. या निमित्ताने वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी मौजे अंधारमळी गावातून विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी काढण्यात आली.
या कार्यक्रमास अतुल तायडे वनपाल, तुकाराम लवटे वनरक्षक, सुपडू सपकाळे वनरक्षक, जिवन नागरगोजे वनरक्षक, नंदु वंजारी वनरक्षक, अरुणा ढेपले वनरक्षक, एन.एस.बाविस्कर शिक्षक, एच.पी.पाटील शिक्षक, व्ही.बी.पाटील शिक्षक, श्रीमती के.एस.बारेला शिक्षिका, डी.एस.कुकटे शिक्षक, के.व्ही.राणे शिक्षक उपस्थितीत होते.