Home क्राईम गल्ल्यातून पैसे चोरणाऱ्या संशयित आरोपीस पोलीस कोठडी

गल्ल्यातून पैसे चोरणाऱ्या संशयित आरोपीस पोलीस कोठडी


जळगाव प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या एका दुकानात दुकानदाराचे लक्ष नसतांना गल्ल्यातून तीन हजार रूपये चोरणारा चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आज सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, कुषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्ये फिर्यादी दिपक किसन स्वामी यांच्या दुकानाच्या पैश्याच्या गल्ल्यातून तीन हजार रूपये काढून चोरी करून फरार झाला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने संशयित आरोपी अक्षय प्रकाश छाडेकर (वय 21) रा. पहूर पाळधी ता.जामनेर जि. जळगाव याला सोमवारी रात्री 8.30 वाजता पहुर पाळधी येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. ए.एस. शेख यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound