Home क्राईम नगरसेविकेला जीवे ठार मारण्याची धमकी

नगरसेविकेला जीवे ठार मारण्याची धमकी

0
40

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील नगरसेविकेला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, येथील तहानगर भागातील नगरसेविका सायमाबी मलीक आबीद या १३ रोजी घरात झाडू मारत असतांना त्यांच्या समोर राहणार्‍या एजाज (उर्फ गुड्डू ) शेख जाकीर या तरूणाने त्यांना गळ्यावर हात फिरवरून जीवे मारण्याचा इशारा करत धमकावले. यानंतर ४ वाजता त्याने पुन्हा एकदा कॉलवरून हात फिरवून धमकावले. यामुळे सायमाबी मलीक आबीद यांनी फैजपूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यावरून संबंधीत तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound