Home धर्म-समाज पाचोरा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस ; पाणी साचल्याने नागरिकांचे हाल

पाचोरा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस ; पाणी साचल्याने नागरिकांचे हाल

0
47

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरासह ग्रामीण भागात काल दि. ८ जुलै रोजी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने भुयारी मार्ग तुडुंब भरल्याने नागरिकांची नाकेबंदी झाली. तर शिवाजीनगर, बस स्थानक रोड परिसरात पुराचे पाणी दुकानांसह घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांसह व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

पाचोरा शहरासह ग्रामीण भागात दि. ८ जुलै रोजी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे पाचोरा शहरातील नागरिकांची नाकेबंदि झाली. पाचोरा शहरातील भुयारी मार्गात येण्या जाण्यासाठी कमरे इतके पाणी साचल्याने हा मार्गच बंद पडला होता. तसेच पाचोरा शहरातील शिवाजी नगर, बस स्थानक रोड येथे मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरल्यामुळे याठिकाणी असलेल्या दुकानांसह घरांमध्ये पुराचे शिरल्याने रहिवाशांसह व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याठिकाणी जणू पुराचे स्वरुप प्राप्त झाले होते. शिवाजी नगर तसेच कृष्णापुरी भागातील स्थानिक युवकांनी पायी येणाऱ्या जाणाऱ्या तसेच दुचाकीवरून जाणाऱ्यांना पाण्यातून रस्ता दाखवत माणुसकीचे दर्शन घडविल्याने या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहॆ.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/361736772772596

 


Protected Content

Play sound