मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून सीबीआय ने त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आज छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या जवळचे समजले जाणारे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना काही दिवसांपूर्वीच सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. याप्रसंगीच त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर आता त्यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. एनएसई अधिकाऱ्यांचे फोन अवैध मार्गाने टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या माध्यमातून त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा ठपका ठेवत हे तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
दरम्यान संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल केल्यानंतर आज सकाळपासूनच त्यांच्याशी संबंधित सोहळा ठिकाणांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. यात काही महत्त्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.