पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कजगाव रेल्वेस्थानकाजवळ एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव रेल्वे स्थानक नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रंमाक ३४६/९ जवळ मंगळवार ५ जुलै रोजी एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला आला आहे. सदर घटनेची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र यांना मिळताच पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. मयत इसमाचे अंदाजे वय ४० वर्ष, उंची – ५ फुट, रंग – काळा सावळा, शरीर बांधा – सडपातळ आहे. तसेच अंगावर हिरव्या रंगाचे फाटलेल्या स्थितीतील बनियान आहे. मयता बाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक 9890633435 वर संपर्क करावा असे आवाहन पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रातर्फे करण्यात आले असुन या घटनेचा पुढील तपास ए. एस. आय. ईश्वर बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. एम. बोरसे हे करित आहे.