Home क्राईम यावल शहरातून गायीची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यावल शहरातून गायीची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाजन गल्लीतून एकाची ५ हजार रूपये किंमतीची गाय चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धनराज युवराज फालक (वय-३५) रा. महाजन गल्ली, यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे गावरान जातीची गाय आहे आहे. सोमवारी ३ जूलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्‌यांनी घरासमोर बांधलेली गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीला आला आहे. त्यांनी गायीचा परिसरात शोधाशोध केली परंतू ती कुठेही आढळून आली नाही. धनराज फालक यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.

 


Protected Content

Play sound