जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळून मजुराची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी तब्बल वर्षभरानंतर एमआयडीसी पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विठ्ठलपेठ येथे रमेश पुंडलिक चौधरी हे वास्तव्यास आहेत. ११ एप्रिल २०२१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळून रमेश चौधरी यांची (एमएच १९ बीएल ८४२३) या या क्रमाकांची चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली होती. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळाली नव्हती. ही दुचाकी अभिषेक ऊर्फ निक्की नंदलाल मिश्रा (वय २१, रा. भुसावळ) व शुभम सुनील पाटील (वय २३, वर्ष रा. कन्हाळा रोड भुसावळ), या चोरुन नेल्याचा संशय रमेश चौधरी यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार तब्बल वर्षभरानंतर रविवार, ३ जुलै रोजी याप्रकरणी रमेश चौधरी यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.