Home क्राईम शिरसोलीतून तरूणाची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरसोलीतून तरूणाची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
27

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील तरूणाची १२ हजार रूपये किंमतीच दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन गोपाल बारी (वय-२३) रा. शिरसोली प्र.बो. ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या तो शिक्षण घेत आहे. कॉलेजला जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ एआर ८५८३) क्रमांकाची दुचाकी आहे. ३० जुन रोजी रात्री ११ वाजता त्याने त्याची दुचाकी त्याच्या घरासमोर पार्कींगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १२ हजार रूपये किंमतीची पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी ३ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.


Protected Content

Play sound