Home क्राईम अपघातातील जखमी झालेल्या दुसर्‍या तरुणाचाही मृत्यू

अपघातातील जखमी झालेल्या दुसर्‍या तरुणाचाही मृत्यू

0
25

जळगाव प्रतिनिधी । पाळधीजवळच्या साई मंदिरानजीक महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या चेतन लक्ष्मण पाटील या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पाळधीजवळ रविवारी दुपारी टायर फुटल्याने चारचाकीने तीन पलट्या घेतल्यानंतर समोरून येणारी दुचाकी त्यावर आदळली होती. रविवारी दुपारी हा ३.३० वाजता हा अपघात झाला होता. यातील दुचाकीचालक वासुदेव माळी याचा काही तासातच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार दुसरा तरुण चेतन लक्ष्मण पाटील (वय २३, रा.आसोदा) याचाही रविवारी रात्री उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.

या अपघातात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी स्नेहलता रूपवते ठार झाल्या होत्या. तर एकूण सात जण जखमी झाले होते. या जखमींमध्ये चेतन पाटील याचा समावेश होता. मृत चेतन याच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound