आज सायंकाळी सात वाजता होणार फडणवीस व शिंदे यांचा शपथविधी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेणार असून नंतर ते संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे दुपारी सव्वादोनच्या सुमारास मुंबईला पोहचले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असून दोन्ही मान्यवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा दाखल करणार आहेत. शिंदे यांच्या मुंबईतील आगमनाप्रसंगी काहीही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून कडेकोटे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

दरम्यान,  आज सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

Protected Content