Home Cities यावल नथुराम गोडसेंचा अपमान करणाऱ्या कमल हसनची चौकशी करा

नथुराम गोडसेंचा अपमान करणाऱ्या कमल हसनची चौकशी करा

0
40


यावल (प्रतिनिधी )नथुराम गोडसे यांचा आतंकवादी म्हणून उल्लेख करणाऱ्या कमल हसनवर वरिष्ठ स्तरावर योग्य ती चौकशी करण्यात यावी व नथुराम गोडसे चा अपमान करणाऱ्या कमल हसन वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष रामचंद्र दाजीबा पाटील यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ ‘मे रोजी सिने अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हे सर्वात पहिले आतंकवादी होते असे उद्गार काढून नथुराम गोडसे यांचा जाणीवपूर्वक मते मिळवण्याकरता हेतुपुरस्कर अपमान केलेला आहे. ते आतंकवादी आहेत याबाबत त्यांचे काही पुरावा नसताना त्यांनी असे वक्तव्य करणे शोभत नाही. त्यांनी जाहीर सभेत गोडसेंना आतंकवादी घोषित करून व हिंदू धर्माचा जाहीररीत्या अपमान केला आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांच्यावर यावल कोर्टाकडून हिंदू धर्माचा व नथुराम गोडसे यांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे. एक महिन्याच्या आत असे पुरावे सादर न केल्यास कोर्टामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असेही रामचंद्र दाजीबा पाटील यांनी निवेदन देतेवेळी पत्रकारांना सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound