Home क्राईम गाळ काढतांना विहीरीत सापडले मानवी कवटी आणि मांडीचे हाड

गाळ काढतांना विहीरीत सापडले मानवी कवटी आणि मांडीचे हाड

123
123

123

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दिक्षीत वाडीत एमएससीबीच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या जुन्या विहिरीतून गाळ काढत असतांना मानवी कवटी व मांडीचे हाड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, विहीर अधिग्रहनाच्या नियमानुसार शहरातील विविध विहिरींचे गाळ उपसण्याचे काम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे. शहरातील दिक्षीत वाडीच्या महाराष्ट्र विद्यूत मंडळ कार्यालयाच्या आवारात जुनी विहीर आहे. या विहिरीतून गाळ आणि घाण उपसण्याचे काम गेल्या आठवड्यापासून सुरु आहे. गाळ उपसत असतांना सोमवारी अचानक कामगारांनी बाहेर काढलेल्या गाळात मानवी कवटी आणि एक मोठे हाड निघाले. घटनेची माहिती तत्काळ जिल्हापेठ पोलिसांना कळविल्यावर प्रभारी अधिकारी संदिप अराक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे कर्मचार्‍यांसह घटनास्थळावर दाखल झाले. कार्यालयातील उपव्यवस्थापक चेतन जगन्नाथ तायडे यांनी खबर दिल्यावरुन जिल्हा पेठ पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound