चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर दणदणीत विजय संपादन केला आहे. तर आमदार मंगेश चव्हाण यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे.
चाळीसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची पंचवार्षिक निवडणुक तब्बल १०० वर्षांनी प्रथमच आज रविवार, दि. २६ जून रोजी घेण्यात आली. यावेळी शेतकरी सहकारी पॅनल व जनपरिवर्तन पॅनल एकमेकांच्या विरोधात होत्या. तत्पूर्वी शेतकरी सहकारी पॅनल प्रदिप देशमुख तर जनपरिवर्तन पॅनल आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आल्या. मात्र रविवार, २६ रोजी निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी एस. व्हि. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी शेतकरी सहकारी पॅनलने प्रतिस्पर्धी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पॅनलचा पराभव करून सर्वच्या सर्व एकूण १३ जागांवर बहुमत मिळविले आहे. यामुळे गेल्या अनेक दशकांपासून सोसायटीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रदिप देशमुख यांची एकहाती सत्ता होती. ती कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते –
प्रदीप रामराव देशमुख ४१८,
साहेबराव भिकन आगोणे ४११,
प्रविण कनकसिंग राजपूत ४०२,
परशुराम भिकन महाले ३९७,
अनंतसिंग देवसिंग पवार ३८६,
प्रदीप देवराव देशमुख ३८३,
अंबू बुधा पाटील ३७१,
कमलाकर उखा गुजर ३६४,
अनिता भिकन गुजर ४३१,
कविता सतीष महाजन ४२८,
महेंद्र जगन्नाथ पाटील ४०५,
देविदास एकनाथ आगोणे ४३९,
मिलिंद नामदेव जाधव ४३८
सर्वच्या सर्व बहुमताने निवडून आले आहेत. तत्पूर्वी एकूण ५ हजार चारशे एकसष्ट मतदात्यांनी यावेळी मतदान केले. त्यापैकी ५, ३९३ मत हे वैद्य ठरले तर ६८ मत अवैध ठरले असून वैध मत पत्रिका संख्या ७,३५ आहे.