Home क्राईम पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता

पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता

0
56


पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी लग्न समारंभातून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली असून बेपत्ता झालेल्या मुलीच्या पालकांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “पाचोरा तालुक्यातील एका गावातील १४ वर्ष १० महिने १० दिवस वय असलेली अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह दि. २५ जुन रोजी पिंप्री ता. पाचोरा येथे नातेवाईकांच्या लग्न समारंभात गेली होती. दरम्यान लग्न समारंभ परिसरातून दुपारी २ वाटेच्या सुमारास आढळून आली नाही.

मुलीच्या पालकांनी व नातेवाईक यांनी सर्वत्र शोध घेवूनदेखील अल्पवयीन युवती आढळून न आल्याने आज रविवार, दि. २६ जून रोजी मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुध्द फुस लावुन पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound