Home राजकीय ‘ते’ आमदार लवकरच परतणार ! : पवार यांना विश्‍वास

‘ते’ आमदार लवकरच परतणार ! : पवार यांना विश्‍वास


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार पुन्हा उध्दव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याचा आशावाद आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

 

महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचे नाट्य रंगले असतांना शरद पवार हे दोन दिवसांपासून दिल्लीत दाखल झाले आहेत. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमदारांची संख्या जास्त दिसत असली तरी येत्या काही दिवसांमध्ये हेच आमदार पुन्हा येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच आमदारांचा पाठींबा असेपर्यंत महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, संजय राऊत यांनी आज गुवाहाटीत गेलेल्या फुटीर आमदारांबाबत केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याबाबत त्यांनी काहीही भाष्य करण्यास नकार दिला. तर राष्ट्रपतीपदासाठी विरोधी उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी आपण आलो होते अशी पुष्टीदेखील त्यांनी जोडली आहे.


Protected Content

Play sound