Home राजकीय अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले !

अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले !

0
42


गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोर सहकारी आमदारांसह स्वतंत्र गट स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून याचे नाव देखील ठरल्याचे समोर आले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात साम टिव्ही या वाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार शिंदे यांच्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे असून याबाबत आज सायंकाळी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुख्य प्रतोद भारत गोगावले यांनी याबाबतचे सूतोवाच केले असले तरी स्पष्ट बोलणे टाळले.

एकनाथ शिंदे यांनी पहिल्यापासून आपण बाळासाहेब यांचे निष्ठावंत पाईक असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यांच्या सोबतच्या सहकार्‍यांनी देखील याच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कालच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिंदेंना ठाकरे आणि शिवसेना हे नाव काढून जगून दाखवा असे आव्हान दिले होते. तर शिंदे याच नावांचा समावेश असणारे नाव देणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 


Protected Content

Play sound