Home Cities जामनेर जामनेर येथे शामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

जामनेर येथे शामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

0
43

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

 

स्व. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २३ जून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी दिन त्यानिमित्त जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी त्यांची प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील छगन झा झाल्टे उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील नगरसेवक सतीश झाल्टे सुहास पाटील डॉक्टर संजीव पाटील दीपक तायडे रवींद्र झाल्टे निलेश चव्हाण उल्हास पाटील दत्तू सोनवणे ज्ञानेश्वर शिंदे जालम सिंग राजपूत नाजिम पार्टी खलील भांजा यांच्यासह भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound