कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ; पैशांची केली मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शनीपेठ परिसरात माहेर असलेल्या तबसुम आदील खाटीक (वय-२१) यांचा विवाह जळगावातील हरीविठ्ठल नगरातील शेख आदील शेख सलीम खाटीक यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती आदील शेख हा दारू पिऊन महिलेला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याच्यावरील कर्ज फेडण्यासाठी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान, सोमवारी २० जून रोजी सायंकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून पती शेख आदील शेख सलीम खाटीक, सासरे सलिम शेख, सासू सयदाबी सलीम खाटीक, जेठ समीर सलिम खाटीक सर्व रा. हरीविठ्ठल नगर, नणंद फिरदोसबी फारूख खाटीक, नंदोई फारूख बसीर खाटीक रा. म्हसावद ता. जळगाव यांच्यांविरोधात शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ इंदल जाधव करीत आहे.

 

Protected Content