जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी उपोषण (व्हिडिओ)

0
26


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगावचे परिवहन अधिकारी व धुळे करवसुली अधिकारी यांच्याविरूध्द अनेकदा तक्रार देवूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवसेना शिव वाहतूक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुल्तान बेग नजीर बेग मिर्झा आणि गणेश ढेंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

 

जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही आणि धुळे येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील करवसूली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांच्याविरोधात अनेकदा तक्रारी देवूनही उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोणतीही दखल घेत नसल्याने शिवसेना शिव वाहतूक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुल्तान बेग नजीर बेग मिर्झा आणि गणेश ढेंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/451525900145384