Home राजकीय सायंकाळी ७ वाजेपर्यंत देशभरात ६१.१४ टक्के मतदान

सायंकाळी ७ वाजेपर्यंत देशभरात ६१.१४ टक्के मतदान

0
36

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील ५९   मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही सहावी फेरी असून बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा सात राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये ९७९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.

 

सायंकाळी ६ वाजेपर्यंत देशभरात सरासरी ५९.७० टक्के मतदान झाले तर  सायंकाळी ७ वाजेपर्यंत देशभरात ६१.१४ टक्के मतदान झाले आहे. यात पश्चिम बंगालमध्ये ८०.१६ टक्के, दिल्लीत ५६.११ टक्के, हरयाणात ६२.९१ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५३.३७ टक्के, बिहारमध्ये ५९.२९ टक्के, झारखंडमध्ये ६४.४६ टक्के, तर मध्य प्रदेशमध्ये ६०.४० टक्के मतदान झाले.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound