Home क्राईम बनावट अकाऊंट तयार करुन तरुणीची फसवणूक

बनावट अकाऊंट तयार करुन तरुणीची फसवणूक

0
101

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील तरुणीचा फोटो वापरुन बनावट अकाऊंट तयार करत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असू याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. या तरुणीचा फोटो वापरुन तीचे इन्स्ट्राग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन बदनामी केली.

याप्रकरणी तरुणीने तात्काळ सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound