शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाचा आज आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पाहणी करून आढावा घेतला.

 

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. तत्पूर्वी या पुलाच्या कामा व्यतिरिक्त त्या लगतचे साईड मार्ग जसे पुलालगतचा जोड रस्ता, पाण्याचा निचरा होणे कामी असलेल्या गटारी, चेंबर्स आदींची पाहणी करण्यात आली.

या पाहणी दरम्यान आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या सोबत माजी महापौर तथा शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, माजी नगरसेवक शरद तायडे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, शहर अभियंता एम .जी .गिरगावकर तसेच PWD चे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री. राउत यांची उपस्थिती होती. तसेच शाखा अभियंता नरेंद्र जावळे , युनिट अभियंता मनीष अमृतकर हे पुलाचे पाहणी दरम्यान उपस्थित होते.

दरम्यान आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आज रोजी कुंभारवाडा पिंप्राळा पुलाची सुद्धा पाहणी केली. यावेळी शहर अभियंता एम.जी गिरगावकर हे उपस्थित होते.

Protected Content