Home क्राईम तरूणासह मित्राला दगड विटांसह लाकडी दांडक्याने मारहाण

तरूणासह मित्राला दगड विटांसह लाकडी दांडक्याने मारहाण

0
44


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशीराबाद येथे दत्त मंदिराजवळ रस्त्यावर तरुणासह त्याच्या मित्राला दगड विटांसह लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी नशीराबाद पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

नशीराबाद येथील महाजन वाडा, वरची अळी भागात गौरव विनोद महाजन हा राहतो. तो मंगळवारी त्याचा मित्र लकी महाजन यांच्यासोबत गावातील दत्त मंदिराजवळ रस्त्यावर  पोलो खेळत होता. यादरम्यान गौरव हा  याच परिसरात जटागीर महाराज मंदिराजवळ बसलेल्या दानिश खान रईस खान याच्याजवळ गेला. त्याचा राग आल्याने दानिश खान यांच्यासह तीन जणांनी गौरव तसेच त्याचा मित्र लकी  महाजन यंना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगड विटां व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. या मारहाणीत गौरव व लकी हे दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी गौरव महाजन याचे काका सतीष महाजन (वय-४७) यांच्या तक्रारीवरुन दानिश रईस खान , फजल खान फरीद खान, मोहम्मद रिक्षावाला, शाहिस्ताबी आसिफ खान सर्व रा. नशीराबाद या चार जणांविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound